ताज्या घडामोडी

बदलापूर! “पोलिस स्थापना दिना”निमित्ताने बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्याच्या माध्यमातून रायझिंग डे साप्ताहाचे आयोजन

रायझिंग डे च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन

कुळगाव बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यात “पोलिस स्थापना दिना”निमित्ताने रायझिंग डे साप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, दिनांक २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान विविध ऊपक्रम पोलिस प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते, दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी डॉन बॉस्को हास्कुल गणेश नगर येथील विद्यार्थ्यांना पोलिस दलाची तसेच सायबर गुन्हे,बालकांचे हक्क, वाहतूक सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन मिळण्यासाठी एका विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी सुमारे १०० विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला असून सदर वेळी सहायक पोलिस निरीक्षक श्री हनुमंत हुंबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या वेळी डॉन बॉस्को हास्कुलचे मुख्याध्यापक श्रीमती कुबेर मॅडम, पोलिस नाईक वाघ आणि ईतर पोलिस अधिकारी तसेच डॉन बॉस्को हास्कुलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

,,
त्याच प्रमाणे दिनांक 03/01/2024 रोजी 10.45 ते 12.30 वा चे दरम्यान रायझिंग डे सप्ताह निमित्त शिवभक्त विद्यामंदिर, व सिंड्रेला इंग्लिश स्कूल बेलवली येथे ऍसेट कम्प्युटर व बदलापुर पश्चिम पोलीस ठाण्याचे वतीने विद्यार्थ्यांना पोलिस दलाची माहिती, सायबर गुन्हे व बालकांचे हक्क, या विषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.


सदर वेळी स्वतः सहा.पोलिस निरीक्षक श्री योगेश बेंडकुळे यांनी पोलीस दलाची माहिती तसेच सोशल मिडियाचे दुष्परिणाम, सायबर सुरक्षा, याबाबत माहिती दिली. तसेच ॲसेट कम्प्युटरचे संस्थापक श्री अभिजीत गुळेकर व अमोल गुलेकर यांनी सायबर अटॅक, सायबर सुरक्षा याबाबत एमकेसीएल मार्फत तयार केलेले प्रेझेंटेशन याची प्रात्यक्षिका सह विद्यार्थीना माहिती दिली. सदर वेळी शिवभक्त विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री म्हस्कर सर, मुख्याध्यापिका श्रीमती अपेक्षा पाटणकर, पोलीस नाईक वाघ व ॲसेट कम्प्युटर चे श्री अभिजीत गुळेकर, अमोल गुळेकर इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेचे 160 ते 170 विद्यार्थी हजर होते.


दिनांक 04/01/2024 रोजी
सकाळी 10:40 वा. ते 11:35 वा. दरम्यान शिशुविहार विद्या मंदिर बदलापूर गाव बदलापूर पश्चिम या शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व पोलीस अधिकारी, अंमलदार यांची संयुक्तिक रेझिंग डे निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली शिशुविहार विद्या मंदिर येथून सुरू होऊन पुढे – शिवाजी पाडा – गणेश चौक – तलाठी कार्यालय फिरून बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन येथे समाप्त झाली. त्यानंतर सदर मुले, पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्या बाबत माहिती देऊन पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेले हत्यारां बाबत सहा. पोलीस उप निरीक्षक श्री. रोकडे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली, तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक घारके मॅडम यांनी मुलींना व मुलांना पोलीस विभागा बाबत माहिती देऊन गुड टच, बॅड टच बाबत मार्गदर्शन केले


त्या नंतर 11:50 ते 12:30 वा. दरम्यान छत्रपती शाहू महाराज विद्यालय पवार कॉम्प्लेक्स येथे रेझिंग डे च्या अनुषंगाने सहा.पोलिस निरीक्षक श्री हनुमंत हुंबे यांनी सायबर गुन्ह्या बाबत माहिती देउन सायबर अटॅक व फ्रॉड कॉलबाबत विद्यार्थी याना माहिती दिली. सदर वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती काळेले, , पर्यवेक्षक श्री जेजुरकर, पोलीस नाईक वाघ इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेचे 130 ते 140 विद्यार्थी हजर होते


दिनांक 07/01/2024 रोजी रेझिंग डे सप्ताह निमित्त दुपारी 11.00 ते. 13.00 वाजता गणपती मंदिर बदलापूर गाव येथे मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम व शांतता समिती, पोलीस मित्र यांच्या बैठकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सदर मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात एकूण चोरीस गेलेले हरवलेले 14 मोबाईलचे हस्तांतरण माननीय मुख्याधिकारी श्री. योगेश गोडसे, कुळगाव बदलापूर नगरपालिका यांचे हस्ते करण्यात आले, सदर कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र घोरपडे, नगरसेवक श्री अनिल भगत, श्री हेमंत चतुरे, समाजसेवक दया पवार, पोलीस पाटील जितेंद्र मेहर, महिला समिती, पोलीस मित्र, शांतता समितीचे पदाधिकारी व नागरिक असे 70 ते 80 लोक कार्यक्रमास उपस्थित होते, सदर मोबाईल हस्तांतरण कार्यक्रमादरम्यान आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक श्री अनिल थोरवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हनुमान हुंबे , सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री योगेश बेंडकुळे यांनी उपस्थित यांना सायबर सुरक्षा बाबत मार्गदर्शन केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.