ताज्या घडामोडी

बदलापूर !! वनविभाग अधिकाऱ्यांच्या संगनमताने वांगणी ग्रामपंचायत प्रशासनाच्या आशिर्वादाने वांगणी मध्ये वनविभागाच्या जागे मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण,,

तहसीलदार अंबरनाथ यांचे पत्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बसवले धाब्यावर,,,

बदलापूर !! वांगणी मधिल वनविभागाच्या आख्यारीत असलेल्या जागे मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, वांगणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वनविभागाच्या जमिनी आहेत, वनविभागाच्या जमिनींचे संरक्षण करणे ही वनविभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, परंतु “कुंपणच शेत खायला लागलं” तर या जमिनींच संरक्षण कस होणार हा एक मोठा प्रश्न आहे, वांगणी शहरातील अनेक वनविभागाच्या जमिनींवर स्थानिक भुमाफियांनी स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी, वनविभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन ईमारतींची पक्की बांधकामे केल्याचे निदर्शनास येत आहे, वनविभागाची जमीन ही वातावरणातील बदलामुळे समतोल राखण्यासाठी त्या ठिकाणी विविध नैसर्गिक योजना राबविण्यासाठी राखीव ठेवली जाते, परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक भुमाफियांनी संगनमताने या ठिकाणी वनविभागाच्या जागेवर स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने इमारती उभ्या केल्या असल्याचे प्रकर्षाने जाणवते,अशाच प्रकारे वांगणी शहरातील सर्वे नंबर १४०, मधिल प्लॉट क्रमांक १७ आणि १९ ही मिळकत वनविभागाची असताना या ठिकाणी वांगणी ग्रामपंचायत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने विकासकाने मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बेकायदेशीर ईमारती उभ्या केलेल्या आहेत,

या बाबत या जागेवर बांधण्यात आलेल्या हॅप्पी होम ईमारती मधिल सदनिकांच्या बेकायदेशीर विक्री देखील करण्यात आल्या आहेत, या बाबत विकासक आणि खरेदीदार यांच्या मध्ये वादविवाद होऊन अनेक परस्परविरोधी तक्रारी बदलापुर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत,सदर बाबतीत वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या असताना देखील वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही ,सदर प्रकरणी तहसीलदार अंबरनाथ यांना देखील कारवाई करण्यासाठी निवेदने सादर करण्यात आली असून मा, तहसीलदार यांनी वनविभागाला या संबंधी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत,मा तहसीलदार अंबरनाथ यांनी एका मागुन एक अशी दोन वेळा वनविभागाला लेखी पत्र देऊन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे,

परंतु स्वतः वनविभागाचे अधिकारी यांच्या संगनमतानेच. वनविभागाच्या जमिनीवर विकासकांना अप्रत्यक्ष परवानगी दिली असल्याने या प्रकरणात वनविभागाचे अधिकारी देखील दोषी असल्याने तहसीलदार अंबरनाथ यांनी अहवाल सादर करण्यासाठी दिलेल्या पत्राला वनविभागाचे अधिकाऱ्यांनी धाब्यावर बसवले आहे, या बाबत तक्रारदार आता आंदोलनात्मक भुमिका घेणार असून मा, तहसीलदार अंबरनाथ यांना नव्याने निवेदन सादर करून वनविभागाचे अधिकारी, स्थानिक वांगणी ग्रामपंचायत अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई करुन अतिक्रमण तातडीने हटवण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर लवकरच आंदोलन करणार सुरू करणार आहेत,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.