ताज्या घडामोडी

सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद (रजि) संस्थेचा आगळा वेगळा उपक्रम

एक वही एक पेन व स्कूल बॅग संकलन उपक्रम व नाश्ता पाणी तसेच असे आपले संविधान पुस्तक वाटप कार्यक्रम

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद (रजि) संस्थेच्या वतीने *एक वही एक पेन व स्कूल बॅग संकलन उपक्रम व नाश्ता पाणी वाटप तसेच असे आपले संविधान पुस्तक मोफत वाटप कार्यक्रम शनिवार दिनांक 13 एप्रिल2024 ते 14 एप्रिल 2024 रोजी सकाळी ठीक 10 ते रात्री 8 वाजता रेल्वेसर्कल वासिंद पश्चिम येथे आयोजित करण्यात आले आहे* तरी सदर उपक्रमात सर्व समाजातील दानशूर व्यक्तिने सहभागी होऊन जास्तीत जास्त शैक्षणिक साहित्याचे सहकार्य करावे असे अवाहन संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड सर व सरचिटणीस जगदिश गायकवाड सर यांनी केले आहे.

सविस्तर वृत्त

एक वही एक पेन संकलन व स्कूल बॅग संकलन उपक्रम दरवर्षीच संस्थेच्या वतीने राबविण्यात येतो. सदर उपक्रमात लोकसहभागातून जमा झालेले शालेय लेखन साहित्य (वह्या,पेन, पेन्सिल, खोडरबर, शाॅपनर, पट्टी,कंपास बाॅक्स, रंगबाॅक्स, स्केचपेन इ. साहित्य) जिल्हापरिषद शाळेतील, आश्रम शाळेतील गरजू वंचित घटकातील जवळपास 2000विद्यार्थांना वाटप करत असतो.

*या वर्षी 3000 विद्यार्थांना शालेय लेखन साहित्य व 500 विद्यार्थांना स्कूल बॅग वाटप करण्याचा संस्थेचा मानस आहे* शासनाकडून विद्यार्थांना गणवेश, पाठ्यपुस्तक, सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती,मध्यान्ह भोजन प्राप्त होत असते परंतु शालेय लेखन साहित्य व स्कूल बॅग प्राप्त होत नाही. *शालेय लेखन साहित्य अभावी गरजू वंचित घटकातील विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यांची शिक्षण प्रक्रिया निरंतर चालावी हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व समाजातील दानशूर व्यक्तींनी एक वही एक पेन व स्कूल बॅग उपक्रमात सहभागी होऊन जास्तीत जास्त सहकार्य करावे. तसेच आपल्याला वस्तू स्वरूपात देणे शक्य नसल्यास रोख स्वरूपात धम्मदान स्विकारले जाईल

*सदर उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वाना संस्थेच्या वतीने असे आपले संविधान पुस्तक सप्रेम भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे* *तसेच 14 एप्रिल रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व आंबेडकरी अनुयायांना नाश्ता व पाणी वाटप करण्यात येणार आहे*

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.