ताज्या घडामोडी

सजवलेल्या ट्रॅक्टर मध्ये बसवून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढत नवागतांचे केले अनोखे स्वागत–शाळा प्रवेशोत्सव २०२४

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा ढोके दापिवली,केंद्र-मुळगांव, तालुका-अंबरनाथ,जिल्हा-ठाणे

*आज दि.१५/०६/२०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा ढोके दापिवली शाळेत इ.१ ली दाखल होणाऱ्या नवागतांचे हार्दिक स्वागत गावातील समाज सेवक सन्माननीय शिवश्री अशोक भोईर यांच्या ट्रॅक्टरला सजवून गावातून मिरवणूक काढत नवागतांचे केले भव्य स्वागत.

*यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल वाजवत स्वागत केले.सारे शिकूया-पूढे जाऊया,हम भी हैं काबिल,मुलगा मुलगी एक समान-आमच्या शाळेत दोघांनाही मान,झाडे लावुया-झाडे जगवुया,स्वच्छ शाळा-सूंदर शाळा, मातृभाषेतून शिक्षण-प्रगतीचे लक्षण,z.p.school-Dhoke dapivali इ.घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.


*शाळा प्रवेशोत्सवात नवागतांचे स्वागत गुलाबपुष्प व खाऊ देऊन करण्यात आले.*
*समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले.*
*अंबरनाथ तालुक्याचे तालुका प्रमुख सन्माननीय शिवश्री बाळाराम दादा कांबरी यांच्या तर्फे सालाबादप्रमाणे उपलब्ध मोफत वह्या व लेखन साहित्य गावचे माजी उपसरपंच तथा शिक्षणप्रेमी समाजसेवक भानुदासदादा गायकर व समाज सेवक नंदुदादा गायकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.चंद्रा ताई भोईर, पर्यावरणप्रेमी समाज सेवक श्री.राजेशजी आपटे, सेवा जेष्ठ प्राथमिक शिक्षक श्री.पांडुरंग पाटील सर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.*
*शाळेचे नवोपक्रमशिल शिक्षक श्री.आनंद सोनकांबळे सर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इ.१ ली च्या नवागत विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या पाट्या गावच्या मा.सरपंच सौ.जागृतीताई भोईर,मा.उपसरपंच श्री.नितिनदादा गायकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.चंद्राताई भोईर,शाळेचे मुख्याध्यापक,श्री.शंकर झाडबुके सर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.*
*विद्यार्थ्यांना गोड शिरा व गुलाब पुष्प शाळेचे मुख्याध्यापक श्री शंकर झाडबुके सर यांनी उपलब्ध केले.*
*सेवा जेष्ठ शिक्षक श्री.पांडुरंग पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना चाॅकलेट उपलब्ध केले.*
*ढोके दापिवली शाळेच्या शाळा प्रवेशोत्सवात मुळगांव केंद्राचे मार्गदर्शक तथा समग्र शिक्षा अभियानचे विषयतज्ञ श्री.भगवान बोरसे सर यांची प्रमुख उपस्थिती होती‌.शिक्षकांना व विद्यार्थ्यांना हस्तांदोलन करत नविन शैक्षणिक वर्षाच्या दिल्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्यांनीही ट्रॅक्टरमध्ये विद्यार्थी समवेत बसण्याचा घेतला आनंद.*
*शाळेच्या स्वयंपाक शिजविणा-या ताई सौ.उषाताई गायकर यांनी गोडपदार्थासह सुग्रास भोजनाची व्यवस्था केली.*
*शाळा स्वच्छता करण्यात मदतनीस सौ.प्रमिलाताई भोईर यांनीही योगदान दिले.


*शाळेला सहकार्य करणा-या स्वयंसेवक शिक्षिका सौ.राखीताई भोईर व स्वयंसेवक शिक्षक श्री.मिलींद गायकर सर यांनीही नवागतांचे स्वागत केले.*
*गावातील मा.सरपंच सौ.माधुरीताई भोईर, समाज सेवक,श्री.अमोलभाऊ भोईर, युवा समाज सेवक श्री.कुमारभाऊ भोईर तसेच पालकांनी या शाळा प्रवेशोत्सवात आपला हिरीरीने सहभाग नोंदविला.*
*शाळा प्रवेशोत्सवानंतर प्रत्यक्ष शालेय कामकाज व वर्गाध्यापनाला सुरुवात झाली.*
*सरतेशेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री शंकर झाडबुके सर व सेवा जेष्ठ शिक्षक श्री पांडुरंग पाटील सर यांनी सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल व दान दातृत्वाबद्दल तसेच विशेष योगदानाबद्दल शतशः आभार मानले.*

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.