ताज्या घडामोडी

महायुतीचीच सत्ता येऊ दे,,ग,,माय,, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच E V M मशिन देवीला साकड,,,

महाराष्ट्र आणि देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष अर्थात महायुतीचीच सत्ता येण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेट ई, व्हि, एम मशिन देवीला साकड घातल आहे,,
बारामती लोकसभा मतदारसंघ हा आधिच दोन पवार गटाच्या एकमेकांवरील कुरघोडी वरुन चर्चेत असताना याच लोकसभा मतदारसंघात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ईव्हीएम मशिन ही देवी असल्याचा साक्षात्कार झाला असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघ हा आता चांगलाच चर्चेत आला आहे,
आज दिनांक ७ मे २०२४ रोजी बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली, अगदी सकाळच्या सुमारास मतदान सुरू होण्याच्या आधी बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला परिसरातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन देवीच्या भक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अचानक हातात आरतीच ताट घेऊन प्रकट झाल्या, ताटात पेटता दिवा लावून या महान ईव्हीएम मशिन देवीच्या भक्तिनीने मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन देवीची आरती ओवाळून मनोभावे पूजा केली, आता देवीची पूजा केल्या नंतर अर्थात रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशिन देवीकडे कोणता वर मागितला असेल हे सांगण्याची सुज्ञ नागरिकांना सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु अचानक रुपाली चाकणकर यांनी केलेल्या बेकायदेशीर प्रतापा मुळे मतदान केंद्रावर ऊपस्थित निवडणूक आयोगाचे अधिकारी मात्र चक्रावून गेले,झाला प्रकार हा संविधान विरोधी असल्याने रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, या मुळे आता न्यायालयीन चौकशीत रुपाली चाकणकर यांच्यावर कोणती कारवाई होते किंवा कसे हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.