ताज्या घडामोडी

ठाणे! मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई,, जिवंत काडतुस आणि पिस्टल,चॉपर खंजीरसह तिन आरोपी जेरबंद,,

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठीक ठिकाणी धडक कारवाई करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे, लोकसभा निवडणूक कोणतीही बाधा न येता ही निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून या अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत, अशाच प्रकारे मुंब्रा पोलिसांनी धडक कारवाई करत तिन आरोपींना पिस्टल, चॉपर खंजीर आणि जिवंत काडतुस सह अटक केली आहे, वरिष्ठांच्या आदेशानुसार मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक उमेश कोरडे आणि मुंब्रा पोलिस स्टेशन ठाणे शहर यांच्या पथकाने अमृतनगर, शिवाजीनगर दर्गा रोड येथील मोकळ्या मैदानात सापळा रचला होता, या ठिकाणी तिन ईसम संशईत रित्या आले असताना त्यांना पळुन जाण्यासाठी वाव न देता त्यांची धरपकड करुन ताब्यात घेतले, आणि स्थानिक पंचासमक्ष त्यांची अंग झडती घेतली असता,आरोपी हमिद राजा ताज ऊद्दिन शेख उर्फ मोनु वय वर्षे २३ राहणार न्युरी अपार्टमेंट रुम नंबर ८ दर्गा गल्ली मुंब्रा ता, जिल्हा ठाणे,याचे कमरेला लावलेले एक अग्नीशस्र व ट्रॅक पॅंटचे उजव्या खिशात तिन जिवंत काडतुस असे अवैध अग्निशस्र मिळुन आले, तसेच ईतर दोन आरोपी रेहान अफसर शेख उर्फ पच्चीस वय वर्षे २३ राहणार एम के टॉवर रुम नंबर ११ रशिद कंपाऊंड कौसा मुंब्रा जिल्हा ठाणे याच्या कमरेला एक चॉपर आणि तिसरा आरोपी रिजवान अफसर शेख ऊर्फ पचास ऊर्फ रिवान वय वर्षे २४ राहणार एम के टॉवर रुम नंबर ११ रशिद कंपाऊंड कौसा मुंब्रा याच्या कमरेला एक खंजीर असा ५६,४००/रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे,नमुद आरोपी यांनी मा, पोलिस आयुक्त ठाणे शहर यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचा भंग करत असताना मिळुन आले असल्याने त्यांचे विरोधात मुंब्रा पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८२/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह तसेच भारतीय हत्यार कायदा ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) १३५ प्रमाणे दिनांक ८/५/२०२४ रोजी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे,सदर गुन्ह्याच्या तपासात या पुर्वी याच आरोपींवर जबरी चोरी आणि शरिरा विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असुन सदर गुन्ह्यात ते पाहिजे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,


सदर कारवाईत श्री आशुतोष डुंबरे/पोलिस आयुक्त ठाणे शहर, ज्ञानेश्वर चव्हाण/सह पोलीस आयुक्त ठाणे शहर, विनायक देशमुख/अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे शहर, सुभाषचंद्र बुरसे/ पोलिस उपायुक्त परिमंडळ १ ठाणे, उत्तम कोळेकर/सहायक पोलिस आयुक्त कळवा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलिस निरीक्षक संजय दवणे सहायक पोलिस निरीक्षक उमेश कोरडे, पोलिस हवालदार ६४४ निलेश पाटील, पोलिस हवालदार २५३५ जितेंद्र देसले, पोलिस हवालदार ६९३३ संतोष गायकवाड, पोलिस शिपाई ७६४१ अण्णा एडके, पोलिस शिपाई २७५८ नितीन पाटोळे, पोलिस शिपाई २५७१ सागर महागडे, पोलिस शिपाई २०३४ गणेश सपकाळे, यांनी केलेली असुन गुन्ह्याचा पुढिल तपास सहायक पोलिस निरीक्षक उमेश कोरडे हे करत आहेत,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.