ताज्या घडामोडी

डान्सबार मधील व्हिडीओ व्हायरल करतो,, अशी धमकी देत शिक्षकाला २ लाखांची मागणी करत ब्लॅकमेल,,

ब्लॅकमेल करणाऱ्या तडीपार गुंडाना पोलिसांकडून अटक

सोलापूर : डान्स बार मधील पोरींसोबत नाचलेले व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देत तडीपार आरोपीने त्याच्या साथीदारा समवेत प्राध्यापकाला दोन लाखाची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २५ मार्च २०२४ ते ११ एप्रिल २०२४ दरम्यान शासकीय विश्रामग्रह येथे घडली आहे
या प्रकरणी प्रवीण भानुदास कांबळे ( वय ३७ रा.कसबा पेठ, माढा) यांनी सदर बजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तडीपार आरोपी अनमोल केवटे व त्याचे साथीदार महेश कांबळे,आसिफ शेख,नागेश बिराजदार,बंदेनवाज शेख (सर्व रा. मंद्रूप) यांच्यावर भा द वी 385,506,34, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रवीण भानुदास कांबळे यांना ११ एप्रिल २०२४ रोजी सोलापूरच्या शासकीय विश्रमग्रह व मंद्रूप महाविद्यालय येथे जाऊन फिर्यादीच्या संमतीशिवाय काढलेले डान्सबार मधील व्हिडीओच्या बदल्यात वरील आरोपीने दोन लाखाची मागणी केली.पैसे नाही दिल्यास आमच्याकडे डान्स बार मधील पोरी सोबत नाचतानाचे फोटो व व्हिडिओ काढलेले आहेत ते आम्ही व्हायरल करू अशी धमकी दिली. तसेच हे व्हिडिओ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पाठवत आहे व संतोष पाटील महाविद्यालय यांच्या मेलवर प्राध्यापक कांबळे यांच्या विरोधात कॉलेज संस्था विद्यापीठ व उच्च शिक्षण विभाग पुणे यांच्याकडे मेल द्वारे तक्रारी अर्ज दाखल असे स्टेटस ठेवून मध्यस्थी मार्फत फिर्यादीस पैशाची मागणी करत आहेत. तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देत आहेत असे फिर्यादीत नमूद आहे .या बाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे हे करीत आहेत..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.