राजकीय

रामदेव ला मुंबईत पाय ठेवू देणार नाही. डेमोक्रॅटिक रिपाई (पतंजली उत्पादनावर बहिष्कार)

*मुंबई दि (प्रतिनिधी) महिलांच्या अवमानाबद्दल जाहीर माफी नाही मागितल्यास पतंजली व योग बाबा रामदेवला मुंबईत पाय देऊ देणार नाही असा ईशारा रिपाई डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर दिला आहे.*

महिलां विषयी योग बाबा रामदेव ने एका सर्वजनिक कार्यक्रमात अपशंब्द बोलून माय माऊलींचा अपमान केला आहे. सत्ता आणी संपत्ती च्या जोरावर माज येऊन रामदेवणे हे वक्तवे केले असून पतंजली उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन डॉ. माकणीकर यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिकन्स यांना केले आहे.

ठाण्यातील शिबिरात बोलताना बाबा रामदेव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तेव्हा महिलांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी म्हटलं, “महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात. आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात,” हे विधान महिलांना लज्जास्पद असून एकप्रकरचा विनयभंग च होय अस मत विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांचं आहे.

पॅन्थर ऑफ सम्यक योद्धाचे संस्थापक महासचिव डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की,
आसाराम, राम रहीम, सत्यसाई, यांच्याच पंक्तीतला रामदेव असून अनेक स्त्रियांचे लालसी भोक्ते असलेल्या या लोकांना नग्नतेत सुंदरता दिसते या तिघांवर जशी कारवाई झाली तशीच कारवायी
बिनडोक रामदेव झाली पाहिजे अशी ही इच्छा व्यक्त केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.